जुळवता जुळवता जुळवत गेलो असेच माझे शब्द
जुळता जुळताच पुकारू लागले माझ्याच विचारांशी युध्द...!
काही केल्या विचार माघार घेत नव्हते
शब्दांनाही थांबावे असे जराही वाटत नव्हते..!
विचार आणि शब्द यांचे ते न संपणारे युध्द होते
या न संपणा-या युध्दात मन मात्र माझे बध्द होते..!
विचारांना धरुन वागलो तर शब्दांचा जय होणार
विचारांना सोडुन वागलो तर मनाचा पराजय होणार..!
मन बिचारे एकटे काहीच करु शकत नव्हते
विचार आणि शब्दांचे युध्द काही केल्या संपत नव्हते..!
शेवटी मात्र एकच केले
जुळलेल्या शब्दांनाच विचारांनी जोडले
तेव्हा कुठे माझे मन जरा भानावर आले....!
January 2007
Ink's song
8 years ago