Thursday, November 17, 2016

हि जुनीच माती
जुनी बाहुले व्याली 
हि जुनीच आठवण
जुने सोबती झाली 
हे जुनेच शब्द 
जुनी बद्धता आली

हे जुनेच विचार 
जुळता मनांचे
ते जुनेच नाव 
जुनी स्तब्धता आली.......!!!! 

Sunday, May 9, 2010

युध्द

जुळवता जुळवता जुळवत गेलो असेच माझे शब्द
जुळता जुळताच पुकारू लागले माझ्याच विचारांशी युध्द...!

काही केल्या विचार माघार घेत नव्हते
शब्दांनाही थांबावे असे जराही वाटत नव्हते..!

विचार आणि शब्द यांचे ते न संपणारे युध्द होते
या न संपणा-या युध्दात मन मात्र माझे बध्द होते..!

विचारांना धरुन वागलो तर शब्दांचा जय होणार
विचारांना सोडुन वागलो तर मनाचा पराजय होणार..!

मन बिचारे एकटे काहीच करु शकत नव्हते
विचार आणि शब्दांचे युध्द काही केल्या संपत नव्हते..!

शेवटी मात्र एकच केले

जुळलेल्या शब्दांनाच विचारांनी जोडले
तेव्हा कुठे माझे मन जरा भानावर आले....!


January 2007

Tuesday, April 20, 2010

आसवांना धीर नाही यातना दंभीर नाही,

उत्तरे घायाळ माझी प्रश्न का खंबीर नाही,

हुंदके मी शांत केले हा गुन्हा गंभीर नाही,

मानअभावी हंस सारे क्षिर प्याले नीर नाही,

रावणाचे भाग्य मोठे राम नाही तीर नाही,

मानवा माणुस हो तू संत किंवा पीर नाही......!

Wednesday, January 14, 2009

थंडीची लाट सगळ्या घरादारातून फिरली

ताटातल्या तीळांनाही मग हुडहुडी भरली ।

त्यांनी पाहील मग आसपास गरम होण्यासाठी

तर गँसवर त्यांना दिसली भली कढई मोठी ।

कढईत तीळांनी मारल्या उड्या भराभर

आनंदाने तिथे नाचत राहीले खाली वर ।

साखरेचा काटेरी कोट तिथे प्रत्येकाला मिळाला

थंडीचा त्रास मग कुठल्या कुठे पळाला ।

पांढ-या शुभ्र कोटांमुळे तीळांच सौंदर्य खुललं

'हलवा' हे नवं नाव त्यानी धारण केलं ।

Saturday, January 10, 2009

विसर पडण्या दिवसराती,

सागरातूनही भरती ओहोटी,

काल चक्राला त्या असतेगती,

मात्र आठवणींना नसे सोबती,

ऋतु वसंता बहर येतो,

मनोमन हे त्यातच रमते,

चैतन्याला पाहण्या जातो,

मात्र अमोलिक काहीच नसते.......!

Wednesday, May 7, 2008

कोण आहेस तु...?

मध्यानीच्या वेळी अखंड तळपणारा भास्कर आहेस तू
कि रात्रीच्या शांत नीश्चल वेळी साद घालणारा भालचंद्र आहेस तू
कोण आहेस तू..?

सतत सलत राहणारा निवडूंग आहेस तू
कि हवा हवासा वाटणारा गुलाब स्पर्श आहेस तू

पावसाआधी येणारी वा-याची झुळुक आहेस तू
कि नंतर येणारा ओल्या मातीचा गंध आहेस तू
कोण आहेस तू..?

पावसाची वाट पाहणारा चातक आहेस तू
कि मनमोहक नृत्य करणारा मोर आहेस तू

वास्तवाचा मखमली स्पर्श आहेस तू
कि स्वप्नांचा अविट अर्थ आहेस तू
कोण आहेस तू..?

Sunday, February 24, 2008

ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो
लाभला चंद्र भर चांदण्यात ओरडलो ।

चालता चालता जरा काय धडपडलो
दगडास वाटले त्याच्या पायी पडलो ।

हा सगंध आला पिच्छा पुरवित माझा
मी कुठे फुलांच्या मांडवात बागडलो ।

पाहुन एकदा काय हसलो व्यथेला
मी व्यथेस माझ्या कायमचा आवडलो ।

पाऊस असा का आला तैसा गेला
मी जणू सांत्वना घेण्यासाठी रडलो ।

मी दिसलो नाही एकांतात कुठेही
माणसात आलो मजला मी सापडलो ।

तु पुस्तक माझे उघडलेस की
मी गुंतत गेलो, तुजला जैसा उलगडलो ।